डिसेंबर २०१५ पर्यंत भारतात फोर जी युजर दीड कोटींवर - Majha Paper

डिसेंबर २०१५ पर्यंत भारतात फोर जी युजर दीड कोटींवर

fourg
मुंबई – बहुतेक मोबाईल ऑपरेटर पुढच्या म्हणजे नवीन २०१५ सालात फोर जी सुपरफास्ट मोबाईल सर्व्हीस लाँच करत आहेत. परिणामी भारतात डिसेंबर २०१५ पर्यंत फोर जी सेवेची युजर संख्या दीड कोटींवर जाईल असा अंदाज कन्सल्टन्सी फर्म पीडब्ल्यूसी ने व्यक्त केला आहे. भारतीय टेलिकॉम सेक्टरमधील प्रवाह लक्षात घेऊन हा अंदाज व्यक्त केला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

भारती एअरटेल, एअरसेल कंपन्यांनी देशातील निवडक क्षेत्रात फोर जी सेवा सुरू केली आहे. रिलायन्सनेही २०१५ मध्ये कमर्शियल पातळीवर फोर जी सेवा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी रिलायन्सने ७० हजार कोटींची गुंतवणूकही केली आहे. बीएसएनएल सह अनेक सर्व्हीस प्रोव्हायडर ही सेवा उपलब्ध करू न देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे युजर संख्याही लक्षणीय रित्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment