सरकारला ९२ कोळसा खाणीतून मिळणार १.४७ लाख कोटी !

coalgate
नवी दिल्ली – सरकारला ९२ कोळसा खाणींचे वाटप आणि लिलावातून १.४७ लाख कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. कोळसा खाणी लिलावाच्या पहिल्या टप्प्यात ह्या खाणी खाजगी आणि सरकारी कंपन्यांना देण्यात येणार आहेत.

एकूण ९२ कोळसा खाणींपैकी ५७ खाणी ह्या ऊर्जा क्षेत्रासाठी आणि ३५ खाणी बिगर ऊर्जा वापर क्षेत्रासाठी आणि कॅप्टिव्ह ऊर्जा प्रकल्पांसाठी देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण १०१ खाणींचे वाटप करण्यात येणार असून त्यातील ६५ खाणींचा लिलाव केला जाणार आहे.
ऊर्जा क्षेत्रासाठी देण्यात येणा-या कोळसा खाणींमध्ये १५,३०५ दशलक्ष टन कोळसा असल्याचे भूगर्भीय सर्वेक्षणात आढळून आले आहे. या खाणींमधून १०० रुपये प्रति टन मूळ किंमत घेण्याचे निश्चित केले असून त्यापोटी १.५३ लाख कोटी रुपये सरकारला महसूल मिळण्याची अपेक्षा आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment