महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीला उच्च न्यायालयाने फटकारले

high-court
मुंबई – उच्च न्यायालयामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना भोगावती नदीत मळीमिश्रीत पाणी सोडल्याने मृत झालेल्या माशांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीला संबंधित कारखान्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतरही मळीमिश्रीत पाणी नदीत कसे काय सोडले जाते, असा सवाल करीत, त्यांच्याविरोधात काय कारवाई केली, असा प्रश्न केला. संबंधित कारखान्यांवर काय कारवाई केली ते प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करा असेही उच्च न्यायालयाने फर्मावले.

इचलकरंजी येथील कामगार युनियन नेते कॉ. दत्ता माने, ऍड्. जयंत बलगुडे, सदाशिव मलाबादे यांच्यासह अन्य नागरिकांच्यावतीने ऍड्. धैर्यशील सुतार यांनी पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी दाखल केलेल्या जनहितयाचिकेची न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमारे झाली. यावेळी ऍड्. धैर्यशील सुतार यांनी भोगावती नदीत सोडण्यात आलेल्या मळीमिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत पडल्याचे प्रसिध्द झालेले वृत्तच न्यायालयात सादर केले.

Leave a Comment