बीसीसीआयच्या नव्या यादीत ज्येष्ठ खेळाडूंना स्थान नाही

bcci
नवी दिल्ली – वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केली असून ‘अ’ श्रेणीत मध्यमगती भुवनेश्वर कुमारला बढती दिली आहे. मात्र गौतम गंभीरसह युवराज सिंह आणि दिनेश कार्तिक यांच्यासह वीरेंदर सेहवाग, हरभजन सिंह आणि झहीर खान या ज्येष्ठ खेळाडूंचा विचार झाला नाही.

गेल्या वर्षी ‘अ’ श्रेणीत असलेले कर्णधार महेंद्रसिंग धोनी, उपकर्णधार विराट कोहली, डावखुरा फलंदाज सुरेश रैना आणि ऑफस्पिनर आर. अश्विनने स्थान राखले आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा यंदा समावेश नाही. त्यात भुवनेश्वरची भर पडली आहे.

‘ब’ श्रेणीत ११ क्रिकेटपटूंचा समावेश असून त्यात अजिंक्य रहाणेसह अंबाती रायडू आणि मोहम्मद शामीचा समावेश आहे. गतवर्षी हे त्रिकुट ‘क’ श्रेणीत होते. गेल्या वर्षी या श्रेणीत असलेल्या गौतम गंभीर आणि युवराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. ‘क’ श्रेणीत सर्वाधिक १६ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यंदा त्यात त्यात डझनभर क्रिकेटपटूंची भर पडलीय. धवल कुलकर्णी, परवेझ रसूल, अक्षर पटेल, करन शर्मा, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव या ताज्या दमाच्या क्रिकेटपटूंनी बीसीसीआयचा वार्षिक करार मिळवलाय. गेल्या वर्षी ‘क’ श्रेणीत असलेले दिनेश कार्तिक आणि जयदेव उनाडकट स्थान राखू शकलेले नाहीत.

‘अ’ श्रेणीत करारबद्ध क्रिकेटपटूला वर्षाकाठी एक कोटी, ‘ब’ श्रेणीत ७५ लाख आणि ‘क’ श्रेणीत ५० लाख रुपये मिळतात.

Leave a Comment