उच्च न्यायालयाने फेटाळली आवाजी मतदानाची याचिका

high-court1
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला दिलासा दिला असून केतन तिरोडकर यांनी फडणवीस सरकारने आवाजी मतदानाने सभागृहात बहुमत सिद्ध केल्याच्या विरोधात केलेली याचिका या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

आवाजी मतदाना करिता वापरण्यात आलेली पद्धत घटनाबाह्य असून मंत्रीपदांची शपथ फडणवीस सरकारने दिली. पण सरकार स्थापन करण्याकरिता कोणी कोणाच्या बाजूने मतदान केले. याबाबत बहुमत सिद्ध करणारे पत्र राज्यपालांना देण्यात आले नसल्यामुळे ही आवाजी पद्धत म्हणजे एक प्रकारे फसवणुक असून तशी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

Leave a Comment