२५ डिसेंबरला प्रभात चित्रपटगृहात शेवटचा खेळ

prabhat
पुणे – पुण्याच्या मराठी चित्रपटप्रेमींना प्रभात चित्रपटगृहात २५ डिसेंबरपर्यंतच चित्रपट पाहता येणार असून सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे थिएटर १० जानेवारीला हस्तांतरित होणार असल्यामुळे २५ डिसेंबर हा अंतिम दिवस असल्याचे प्रभात चित्रपटगृह व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

या चित्रपटगृहाचे किबे लक्ष्मी थिएटर असे नाव इंदूरचे संस्थानिक रामचंद्र किबे यांनी आपली पत्नी लक्ष्मी यांच्या स्मृति जपण्यासाठी ठेवले होते. हे चित्रपटगृह प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारांनी चालवण्यासाठी घेतले. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीवरून या चित्रपटगृहाचे नाव प्रभात असे ठेवले होते. या भागीदारांपैकी विष्णुपंत दामले यांचे नातू विवेक दामले सध्या चित्रपटगृहाचे व्यवस्थापक असून कराराची मुदत संपत आल्याने हे थिएटर १० जानेवारीला सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे हस्तांतरित करावे लागणार असल्यामुळे २५ डिसेंबरला चित्रपटगृहात शेवटचा खेळ होऊन ते बंद करण्यात येणार आहे.

Leave a Comment