शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणार स्वाभिमानी – राजू शेट्टी

raju-shetty
नांदेड – नांदेडमधील काकांडी गावात स्वाभिमानीने सुरू केलेल्या दुष्काळ निवारण यात्रेचा समारोप प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणार असल्याची घोषणा केली.

स्व:तच्या पायाला विजेच्या तारा गुंडाळून घेत काही दिवसांपूर्वी काकांडी गावातील तुळशीदास मंडवाड या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन स्वाभिमानीच्या नेत्यांनी या यात्रेचा समारोप केला.

बुलढाणा जिल्ह्यातील चांडोल गावातून दुष्काळ निवारण यात्रेला सुरूवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली होती. या यात्रेच्या सहाव्या दिवशी काकांडी येथे समारोप करण्यात आला. साधारण दीड हजार किलोमीटरचा प्रवास करुन ही दुष्काळनिवारण यात्रा काकांडीला पोहचली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये यासाठी स्वाभीमानीने एक हेल्पलाईन सुरू केल्याची माहितीही खासदार राजू शेट्टींनी दिली.

Leave a Comment