मुंबई महापालिका सुका कचरा विकून वाढविणार उत्पन्न

bmc
मुंबई, – यापुढे बृहन्मुंबई महानगरपालिका ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यावर अधिक भर देणार असून त्यासाठी सुका कचरा गोळा करणारी वाहने आणि कच-याचे डबे यांची वाढ करणार आहे. कचरा वेचकांद्वारे सुका कचरा गृहनिर्माण संस्था, आस्थापने येथून गोळा केला जाईल. त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत पालिका मार्च २०१६ नंतर वाहने, मनुष्यबळ पुरवून सुका कचरा गोळा करणार आणि तो विकण्यासाठी निविदा मागवून घसघशीत आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा पालिकेचा मानस आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. मात्र, स्वच्छ भारत अभियानांर्गत ओला-सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे गरजेचे आहे. पण सध्या तरी तसे होत नाही. त्यामुळे पालिकेने गृहनिर्माण संस्था, गलिच्छ वस्ती, गावठाण, दुकानदार, हॉटेल्स, स्टॉल, फेरीवाले यांच्याकडून निर्माण होणारा ओला कचरा कुंडय़ा मध्ये ठेवावा. सुका कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर करावा किंवा तो विकून आर्थिक उप्तन्न मिळवावे, अशी सूचना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली होती. त्यावर आयुक्तांनी आपला अभिप्राय दिला आहे. या अभियानात राज्यपाल, लोकप्रतिनिधी, पालिका, सामाजिक संस्था, शालेय, विद्यालयांचे विद्यार्थी, राजकीय पक्ष यांनी सहभाग घेतला आहे.

पालिकेचा पाच वर्षाचा स्वच्छता आराखडा तयार केला जात आहे. ओला-सुका कचरा गोळा करायला स्टीलचे वेगवेगळे डबे ठेवले आहेत. कचरा गाडीद्वारे कचरा गोळा केला जातो. पालिका १२० लिटर क्षमतेच्या २० हजार आणि २४० लीटर क्षमतेच्या दीड हजार कचराकुंडय़ा लावण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. स्वच्छतेसाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे, अशी माहिती पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिली. तसेच यावेळी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात आल्याने गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सुका कचरा गोला करायला वाहनांची संख्या वाढविणारा कचरा वेचकांमार्फत सुका कचरा गोळा करून मार्च २०१६ नंतर सुक्या कच-याच्या संकलनासाठी वाहने आणि मनुष्यबळ पुरवले जाऊन हा सुका कचरा विकून आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी निविदा काढल्या जातील, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

Leave a Comment