त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानचा मनमानी कारभार

trimbkeshwar
त्र्यंबकेश्वर (नाशिक) – त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थान ट्रस्टने सुरक्षेचे कारण पुढे करून त्र्यंबकेश्वर मंदिरात फूल, नारळास बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, तसे फलक संपूर्ण शहरात लावण्यात आल्यामुळे पूजा साहित्य विक्रेते व भाविकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात आणि शिवलिंगावर पाणी, दूध, फुले, पूजा साहित्य, नारळ अर्पण करतात. मात्र आता यापुढे भाविकांना आपण आणलेले पूजेचे साहित्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर जमा करण्यात येणार आहेत. यासाठी देवस्थान ट्रस्टने दहशतवादी कृत्याचा धोका असल्याचे कारण पुढे केले असून त्याला पोलिस यंत्रणांच्या सूचनेची जोड दिली आहे. भाविकांनी अपर्ण केलेले साहित्य सायंकाळच्या पूजेस देवासमोर ठेवण्यात येईल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment