मध्य रेल्वेची लोकल होणार सुपरफास्ट

mumbai-local
मुंबई – मध्य रेल्वेवरील ’डीसी-एसी’ परिवर्तनामुळे लोकलच्या वेगावर लागलेला ब्रेक आता निघाला आहे. शनिवारच्या विशेष ब्लॉकमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य रेल्वेने शनिवारी रात्री सीएसटी-कल्याणदरम्यान ’डायरेक्ट करंट’ (डीसी) विद्युतप्रवाहाचे ’अल्टरनेटिव्ह करंट’ (एसी) परिर्वतनाची चार वेळा यशस्वी चाचणी घेतल्यामुळे लवकरच ’मरे’चा वेग ८० किमी प्रति तासावरून १०० किमी प्रतितासापर्यंत पोहोचेल. भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. ’मरे’वर गेल्या १८ वर्षांपासून डीसी-एसी परिवर्तनासाठी कामे सुरू आहेत. त्यापैकी सीएसटी ते कुर्लापर्यंतचे काम शिल्लक होते. त्या परिवर्तनासाठी आवश्यक असणार्‍या चाचण्या घेण्यासाठी रेल्वेने शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेतला होता. त्यात, रात्रभर या सीएसटी-कल्याण मार्गावर एकूण चार वेळा परिवर्तनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा सकाळी विद्युतप्रवाह ’डीसी’वर वळवण्यात आला. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नजिकच्या काळात परिवर्तनाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे.

Leave a Comment