इस्लामाबाद – राजधानी इस्लामाबाद येथे पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत ३०० पेक्षा जास्त अतिरेक्यांना अटक करण्यात आली असून यात काही विदेशी अतिरेक्यांचाही समावेश आहे.
पाक सुरक्षा दलाने केली ३०० अतिरेक्यांना अटक
गेल्या मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावर येथील सैनिकी शाळेवर हल्ला करून १४२ विद्यार्थ्यांसह १६० जणांना गोळ्या घालून ठार केले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी पाक सरकारने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. सहा श्वान पथकं, सशस्त्र दलांचे हजारो सैनिक, बॉम्ब निकामी पथक आणि कमांडोजनी शनिवारी इस्लामाबाद आणि आसपासच्या परिसरात व्यापक मोहीम राबविली. ३०० पेक्षा जास्त अतिरेक्यांना अटक करण्यासोबतच त्यांच्याजवळून शस्त्र, काडतुसे आणि स्फोटकांचा प्रचंड साठाही ताब्यात घेण्यात आला, अशी माहिती सुरक्षा अधिकार्यांच्या हवाल्याने ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिली.