नवी दिल्ली – लवकरच राष्ट्रभाषेत अर्थातच हिंदीतून बँक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मोबाईलवर येणारा एसएमएस आणि एटीएम मशीनमधून ग्राहकांना मिळणारी स्लिप प्राप्त होऊ शकणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने पाठविला असून, तो मान्य होण्याची शक्यता आहे.
आता राष्ट्रभाषेत बँकेचा एसएमएस, एटीएम स्लिप
गृहमंत्रालयाने हा पुढाकार शासकीय कामकाजात हिंदीच्या वापरावर भर देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून घेतला आहे. मंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाने म्हटले आहे की, इंटरनेट बँकिंग वेबसाईटवर तसेच मोबाईल बँकिंग अप्लिकेशनमध्ये हिंदी भाषेत काम करण्याची सध्या तरी कोणतीही सुविधा नाही. आम्हाला असे वाटते की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या ग्राहकांना बँक व्यवहारावरील ई-मेल आणि एसएमएस पाठविण्यासाठी हिंदीचा वापर करायला हवा. या संदर्भातील पत्रव्यवहार मंत्रालयाकडून सर्व बँकांना करण्यात आला आहे.