हृदयविकाराच्या झटक्याने श्वान शेरूची प्राणज्योत मालवली

sheru
मुंबईः मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार असलेल्या शेरू या श्वानाचा मृत्यू झाला असून परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने शेरूची प्राणज्योत मालवली.

दहशतवाद्यांनी केलेल्या मुंबई हल्ल्यावेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर शेरू बेछूट गोळीबारात जखमी झाला होता. तेव्हापासूनच तो परळच्या या रुग्णालयात उपचार घेत होता. पण, अखेर त्याने जगाचा निरोप घेतला.

अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी सीएसटी स्टेशनवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारावेळी शेरू देखील रेल्वे स्थानकात होता. दहशतवाद्यांच्या तीन गोळ्या शेरूला लागल्या होत्या. स्थानकात विव्हळत पडलेल्या या श्वानाला फोटोग्राफर श्रीपाद नाईक यांनी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते.

डॉक्टरांनी त्याच्या शरिरातील दोन गोळ्या काढल्या, श्वसननलिकेत एक गोळी तशीच अडकून होती. तेव्हापासून तो याच रुग्णालयात उपचार घेत होता. शेरुबद्दल कळल्यानंतर एका पारशी कुटुंबाने या बहाद्दर श्वानाला दत्तक घेतले. त्याच्या उपचारासाठी लागणारा दर महिन्याचा सर्व खर्च हे कुटुंब करत होते.

Leave a Comment