पाकिस्तानला अमेरिकेकडून संरक्षण खर्चासाठी मदत

obama
वॉशिंग्टन – वार्षिक संरक्षण मोहिमेअंतर्गत अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानला संरक्षण खर्चासाठी एक अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रीय संरक्षण कायदा २०१५ नुसार अमेरिकेच्या ५७८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण खर्चाला मंजुरी दिली. त्यातून एक अब्ज डॉलर्सची मदत पाकिस्तानला दिली जाणार आहे.

अमेरिकी सैन्याला पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या मदतीच्या बदल्यात हे अनुदान देण्यात येणार असून हा निधी देताना अमेरिकेने पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यात दहशतवादी संघटनांच्या विरोधात पाकिस्तानने कारवाई करायची आहे.

Leave a Comment