दहशतवादी हल्ल्यात सात पोलीस जवान ठार

attack
काबूल – रविवारी अफगाणिस्तानातील उत्तर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात पोलीस जवान ठार झाल्याची माहिती अफगाण पोलीस अधिका-यांनी दिली.

जावझान प्रांताचे प्रमुख पोलीस अधिकारी अब्दुल मनन रौफी यांनी क्वाश्तेपा जिल्ह्यातील एका गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात पोलीस जवान ठार झाले तर पाच जण जखमी झाल्याची माहिती दिली. तसेच यावेळी झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. तालिबानी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Leave a Comment