आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी इशांत शर्माला दंड

ishant
ब्रिस्बेन – भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या मानधनातून भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुस-या कसोटी सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी १५ टक्के रक्कम कापून घेण्यात असून त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला षटकांची गती न राखल्यामुळे ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

दुस-या कसोटीतील पहिल्या डावात स्मिथला बाद केल्यानंतर इशांत शर्माने अशोभनीय शेरेबाजी केली होती. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.१.४ लेव्हल १ चा भंग केल्याप्रकरणी इशांतला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर दुस-या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे स्टीव्हन स्मिथला ६० टक्के दंड तर सहका-यांना तीस टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

Leave a Comment