आता लवकरच आपल्या कारमध्ये बिल्ट-इन अँड्रॉईड!

anroid
सान फ्रान्सिस्को – जाएंट सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या ‘गुगल’ने स्मार्टफोनच्या विश्वात आपले पाय खंबीर रोवल्यानंतर आता त्यांची अँड्रॉईड सिस्टीम कारच्या दुनियेत धूम माजवण्यास सज्ज झाली असून खास कारसाठी असलेले अँड्रॉईड व्हर्जन विकसित करण्याच्या कामाला गुगलने सुरुवात केली आहे. हे व्हर्जन बिल्ट इन स्वरूपात कारमध्ये उपलब्ध असेल. ज्यामुळे स्मार्टफोनविना मोटारचालकांना इंटरनेटचे सर्व फायदे घेता येणार असून हे पाऊल सध्याच्या अँड्रॉईड ऑटो सॉफ्टवेअरच्या पुढचे ठरणार आहे.

स्मार्टफोनमधील अँड्रॉईडच्यामाध्यमातून सॉफ्टवेअर जरी येत असले तरी यासाठी कारमध्ये फोनची जोडणी केल्यानंतरच बिल्ट इन स्क्रीनच्या माध्यमातून इंटरनेटवरील म्युझिक, मॅप आणि इतर अ‍ॅप्सचा वापर करता येतो. मात्र नव्या विकसित करण्यात येणा-या बिल्ट इन अँड्रॉईड तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन जोडणीची गरज भासणार नसून कारविश्वातील गुगलचे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अँड्रॉईड ऑटोच्या या दीर्घकालीन योजनेबाबत गुगलकडून अधिकृत माहिती अथवा कालावधी स्पष्ट करण्यात आलेला नाही. मात्र दोन सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉईडची पुढील आवृत्ती ज्यावेळी सादर करण्यात येईल तेव्हाच अँड्रॉईड ऑटोही जगासमोर आणले जाईल. साधारण वर्षभराचा कालावधी जाईल.

Leave a Comment