मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक राजकारण्यांनी आपल्या निष्ठा बदलण्यास सुरवात केली आहे. मुंबई कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन राईन नाराजीमुळे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. कॉंग्रेसचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील पदाधिकार्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. परिणामी पक्षाचे अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत. राईन शिवसेनेत जाण्याच्या विचारात आहेत. त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील एका नेत्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावरून मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राईन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राईन उत्तर भारतीय मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे ते शिवसेनेत आल्यास पक्षाला उत्तर भारतीय मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळू शकेल.
1 thought on “शिवसेनेच्या वाटेवर कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राईन”
Leave a Comment
You must be logged in to post a comment.
नविन मंत्रीमंडल यादी समाविष्ट नाही