नीर डोसा

neer
साहित्य – १ वाटी जाडसर तांदूळ, नारळाचे ओले खोबरे २ ते ३ चमचे, मीठ चवीनुसार, आवश्यकतेनुसार तेल
कृती- तांदूळ स्वच्छ निवडून धुवावे आणि ३ ते ४ तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर उपसून पाणी काढून टाकावे. तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत त्यात वाटतानाच ओल्या खोबर्‍याचा कीस घालून मिश्रण बारीक वाटावे.हे मिश्रण थोडा वेळ तसेच ठेवावे. डोसे करताना त्यात पाणी व चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण पातळसर करावे.

डोशाचा तवा तापत ठेवावा. चांगला तापला की थोडे तेल घालून ते तव्यावर पसरवून घ्यावे. नंतर १ ते दीड पळी डोसा मिश्रण तव्यावर घालावे आणि पसरवून घ्यावे. तव्याच्या कडेने १ चमचा तेल सोडावे. डोसा खालून तांबूस रंगावर होत आला की काढून घ्यावा. दोन्ही बाजूंनी भाजण्याची आवश्यकता नाही. हा डोसा सांबार, नारळाची चटणी अथवा कोरडी चटणी पुडी बरोबर खाण्यास द्यावा. १ वाटी मिश्रणाचे साधारण पणे ८ ते ९ डोसे होतात.