मुंबई : आदर्श इमारतीच्या चौकशीसाठी परवानगी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मिळाली होती. पण काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत वादामधून ही परवानगी मिळाल्याचा आरोप आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे.
आदर्श प्रकरणाची चौकशी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामुळेच
मुंबईमध्ये आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली. तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के सिंह यांनीच ए.के अॅन्टनी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. कारण त्यांचे पूर्वाधिकारी दीपक कपूर आणि व्ही.के सिंह यांच्यात अंतर्गत वाद होते.
कपूर यांचा स्वत:चा तसेच त्यांच्या नातलगांचे फ्लॅट आदर्शमध्ये असल्यानेच व्ही.के सिंह यांनी अॅन्टनींकडे अशा प्रकारची मागणी केल्याचे सदस्यांनी म्हटले आहे. तसंच या प्रकरणी सीबीआयने खोटे आरोपपत्र दाखल केल्याचा आरोपही आदर्शच्या सदस्यांनी केला.