मोठय़ा वाहनांवरील टॅक्स वाढविणार!

chandrakant-patil
नागपूर – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत आम्ही टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करावे लागेल. त्यासाठी प्रारंभी चारचाकी वाहनांवरील टोल रद्द करून मोठय़ा वाहनांवर जादा टॅक्स लावता येतो का? याचे सर्वेक्षण सध्या सुरू असल्याचे प्रतिपादन केले.

कोल्हापूरची जनता गेली तीन वर्षे टोलविरोधात आंदोलन करते आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने जे करारनामे केले आहेत त्याची शहानिशा आम्ही करीत आहोत. करारनाम्याचा हा मसुदा राज्य सरकारने केल्याचे दिसत नाही, तर हे मसुदे सदर कंपन्यांनी करून त्यावर विभागाच्या अधिका-यांनी स्वाक्ष-या केल्याचे कळते. त्याची छाननी आम्ही सुरू केली आहे. युती सरकारच्या काळात मुंबईच्या पाच नाक्यांवर टोल नाके सुरू झाले. त्याला जवळजवळ २० वर्षे होत आली. या मार्गावर प्रत्यक्षात खर्च किती झाला व वसूल किती झाला याची छाननी आम्ही सुरू केली आहे.

Leave a Comment