मुख्यमंत्री आणि माझ्यात कोणताही वाद नाही : खडसे

eknath-khadse
नागपूर – भारतीय जनता पक्षात मी ज्येष्ठ आहे, तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणताही वाद नाही. त्याशिवाय माझा कोणताही शब्द मुख्यमंत्री मोडत नाहीत, असे वक्तव्य महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे केले. या वेळी ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे कोणतेही वैर नाही. मी विरोधी पक्षनेता असताना त्यांना सभागृहात बोलायची खूपदा संधी दिली आहे. तसेच परदेशात आम्ही अनेक वेळा अभ्यासदौर्‍यावर सोबत गेलो आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझा कोणताही शब्द मोडत नाहीत, असेही सांगायला ते विसरले नाहीत. पक्षात ज्येष्ठ असलो तरीही पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. मी पहिल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे अनेक चढउतार आले तरीही मी पक्षाचे काम करीत राहिलो, असे खडसे यांनी नमूद केले.

Leave a Comment