तालिबान प्रमुख फजलुल्लाहचा हवाई हल्ल्यात खात्मा !

maulana
इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यात पेशावरमधील आर्मी स्कूलवर हल्ला करणार्‍या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान संघटनेचा प्रमुख मौलाना फजलुल्लाह मारला गेल्याचे वृत्त असून हे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.’द नेशन’च्या वृत्तानुसार, फजलुल्लाहच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी पाकिस्तान संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात आली. मात्र, पाकिस्तान आर्मीने यावर भाष्य केलेले नाही.

‘द नेशन’च्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर तालिबान कमांडर फजलुल्लाह पाकिस्तान एअरफोर्सच्या फायटर जेट्सने केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानात मारला गेला आहे. काही खासगी न्यूज चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या लष्कराने तालिबानविरोधात संयुक्त कारवाई केली आहे. सुत्रांनी सांगितले, की दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर फजलुल्लाहला निशाणा बनवण्यात आले.

Leave a Comment