आता रॅगिंग करणाऱ्यांची खैर नाही….

ravindra-waikar
नागपूर – उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात रॅगींगचा गुन्हा सिध्द झाल्यास संबंधिताला तब्बल दोन वर्षांचा तुरूंगवास, दहा हजाराचा दंड आकारला जाईल आणि त्याला कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

भाजपचे सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या संबंधीचा तारांकित प्रश्न विचारला होता. सावकारे यांनी महाविद्यालयात सातत्याने होत असलेले रॅगींगचे प्रकार रोखण्यासाठी शासनाने २००७ मध्ये आदेश काढूनही रॅगींग विरोधी समित्या स्थापन झाल्या नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याची बाब खरी आहे का? असा सवाल केला. त्यावर स्पष्टीकरणात राज्यमंत्री म्हणाले की, राज्यातील महाविद्यालयात सतत होत असणारे रॅगींगचे प्रकार रोखण्यासाठी २८ शासकीय महाविद्यालयांपैकी २७ महाविद्यालयात समित्या स्थापन केल्या असून खाजगी महाविद्यालयांना समित्या स्थापन करण्यासंबधीच्या नोटीसा पाठवून सूचित करण्यात आल्याचे सांगितले.

Leave a Comment