मिस वर्ल्ड स्पर्धेत यापुढे बिकीनी राऊंड नाही

miss
मिस वर्ल्ड स्पर्धा संघटनेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले यांनी या स्पर्धेत यापुढे स्विमसूट राऊंडचा समावेश करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. या राऊंडबाबत कांही जाणकारांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून हा निर्णय घेतला गेल्याचे त्यांनी सांगितले.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी युवतींनी बिकीनी घालून चालणे याची अजिबात गरज नाही. ही स्पर्धा पाहणार्‍या महिलांना या राउंडशी कांही देणे घेणे नाही तसेच आम्हालाही या राऊंडशी देणे घेणे नाही. त्यामुळे यापुढे हा राऊंड या स्पर्धेत अंतर्भूत केला जाणार नाही. १४ डिसेंबरला पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत हा राऊंडही झाला होता. या स्पर्धेत द.आफ्रिकेच्या रोलेन स्ट्रॅसने मिस वर्ल्ड बनण्याचा मान मिळविला आहे.