मुंबई: आपल्या यूजर्संना नव नवीन फिचर्स देण्याचा फेसबूकने सपाटाच लावला असून यात आणखी एका फिचरची भर पडणार आहे. आता फेसबूक वरही जुन्या वस्तू विकण्यासाठी एक नवे फिचर आपल्या यूजर्सला उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.
आता फेसबूकवरही विका जुन्या वस्तू!
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फेसबूकवर लवकरच ‘सेल समथिंग’ या नावाचा एक नवा ऑप्शन येणार असल्याचे वृत्त गॅझेट संदर्भातली ‘नेक्स्ट वेब’ या साईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सेल समथिंग हा ऑप्शन राईट पोस्ट या ऑप्शनच्या पुढे असणार आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्यात, नाव, किंमत तसेच विक्रीसाठी काढलेल्या वस्तूची माहिती भरावी लागणार आहे.
याशिवाय यात अॅटॅच फोटो, पिक अप आणि डिलीवरीची माहिती देण्यासाठीचे ऑप्शन उपलब्ध असणार आहेत. या सर्व फॉर्म्यालिटीज पूर्ण केल्यानंतर आपल्या वस्तूची माहिती जाहिरात स्वरूपात फेसबूकवर दिसणार आहे. मात्र असे असले तरी या विक्रीच्या बाबतीत पैसे कसे हस्तांतरीत केले जाणार आहेत याबाबत कोणतीही माहिती समजली जाणार नाही.