सरकारी गुप्त मेल लिक होण्याची शक्यता संपली

bsnl
सरकारी कार्यालयातून पाठविल्या जाणार्‍या गोपनीय मेल लीक होण्याचा धोका आता उरलेला नसल्याचे सांतले जात आहे. कारण या सर्व गोपनीय मेल पाठविण्यासाठी देशी सर्च इंजिनचा वापर सुरू करण्यात आला असून भारत संचार नियम लिमिटेड (बीएसएनएल) ने सरकारच्या आदेशानुसार खास सर्च इंजिन सुरू केले आहे. केंद्रीय कार्यालयातून या सर्च इंजिनचा वापर सुरूही केला गेला आहे.

इंटरनेट सर्च साठी गुगल, याहू, बिंग सर्च इंजिनचा प्रामुख्याने जगभर वापर केला जातो. त्यात इंटरनेटच्या माध्यमातून पाठविलेला सर्व मजकूर सर्च इंजिनच्या मुख्य सर्व्हरमध्ये साठविला जातो व त्यामुळेच गोपनीय माहिती लीक होण्याची शक्यता वाढते. देशशच्या सुरक्षेचा मामला असेल तर हे फारच मोठ नुकसान ठरू शकते. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने भारत संचारला देशी सर्च इंजिन बनविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे सर्च इंजिन बनविले गेले असून बीएसएनएल सीओ डॉट इन सुरू करण्यात आले आहे.

१ डिसेंबरपासूनच या सर्च इंजिनचा वापर करून केंद्रीय सरकारी विभागाच्या सर्व मेल पाठविल्या जात असल्याचे समजते.

Leave a Comment