शिओमीपाठोपाठ वन प्लस वन वरही बंदी

vanplus
दिल्ली – दिल्ली हायकोर्टाने चीनी स्मार्टफोन मेकर शिओमीवर त्यांचे स्मार्टफोन भारतात विक्री आणि आयातीसाठी बंदी घातल्यापाठोपाठ आता वन प्लसच्या वन या स्मार्टफोनची विक्री व आयात करण्यावरही बंदी जारी केली आहे. मायक्रोमॅक्स कंपनीने वन प्लस विरोधात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ही बंदी लागू केली गेली असल्याचे समजते.

वन प्लसने त्यांचा लेटेस्ट वन स्मार्टफोन २ डिसेंबर रोजी भारतात लाँच केला आहे. मात्र मायक्रोमॅक्सच्या दाव्यानुसार या फोनसाठी वापरण्यात आलेल्या सियानोजेन ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर मायक्रोमॅक्सने यापूर्वीच करार केला असून ही सिस्टीम यू ब्रँडनेमने वापरली जाणार आहे. याच नावाने हे फोन भारतात विकले जाणार आहेत. मात्र वन प्लसने याच ऑपरेटिंग सिस्टीमचा फोन विक्री सुरू केल्यामुळे कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागते आहे. मायक्रोमॅक्सचे हे म्हणणे मान्य करून न्यायालयाने वन प्लसच्या स्मार्टफोन विक्रीवर व आयातीवर बंदी घातली आहे. अर्थात शिल्लक असलेला स्टॉक कंपनी विकू शकणार आहे.

वन प्लसच्या वन ची किंमत २१९९९ रूपये असून त्याला ५.५ इंची स्क्रीन, मल्टीपल कॅमेरा ऑप्शन, गोरिल्ला ग्लास, १६ ते ६४ जीबी मेमरी, १० बोटांचा मल्टीटच सपोर्ट अशी फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment