‘केवायसी’चे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेला दंड

icici
मुंबई- रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयसीआयसीआय आणि बँक ऑफ बडोदा यांना ‘केवायसी’ (नो युवर कस्टमर) नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड केला आहे.

आयसीआयसीआय बँकेला ५० लाख तर बँक ऑफ बडोदाला २५ लाख रुपयांचा दंड आरबीआयने केला आहे. याच कारणासाठी आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ पटियाला यांना दंड केला आहे.

आरबीआयने यासंदर्भात निश्चित करुन दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने हा दंड केल्याचे बँकेने म्हटले आहे. यासंदर्भात ऑगस्ट २०१३मध्ये या पाच बँकांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. काही खात्यांचा वापर चेक, डीडी आणि पोस्टर ऑर्डरसाठी करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ही खाती कोणाची आहेत याकडे या पाच बँकांनी लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे अशा खात्यांवर एक महिना ते दोन वर्षापर्यंत व्यवहार सुरु असल्याचे समोर आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Leave a Comment