लाहोर – पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झाकीउर रहमान लख्वीला पाच लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे पाकिस्तानी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
२६/११ हल्ल्याच्या सूत्रधाराला जामीन
पाकिस्तानी न्यायालयात सात दहशतवाद्यांविरोधात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्या प्रकरणी खटला सुरु असून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सहभागा प्रकरणी २००९ मध्ये लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी लख्वी, अब्दुल वाजीद, मझहर इक्बाल, सादीक, शाहीद जामील रीयाझ, जामील अहमद आणि युनूस अंजूम यांना अटक करण्यात आली होती.