शिवसेना आमदाराने पोलिसाच्या कानशिलात लगावली

harshwardhan
नागपूर: पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी लगावल्याची घटना पुढे आली असून नागपूरात शिवसेना पक्षप्रमुखांना आमदार जाधव भेटायला गेले असता हा प्रताप केला आहे.

आमदार जाधव यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंना भेटू न दिल्याने त्यांनी ही मारहाण केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या नागपुरात आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आमदार जाधव हे उद्धव ठाकरे ज्या हॉटेलमध्ये आहेत, तिथे गेले असता त्यांना पोलीस अधिकाऱ्याने अडवल्यामुळे जाधव यांनी थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली. मदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत.

Leave a Comment