पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर डाळ्याजवळ कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली असून या अग्नितांडवात हा ट्रक पूर्णत: जळून खाक झाला आहे. गेल्या दोन दिवसांतील मुंबई-पुणे महामार्गावर आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुन्हा अग्नितांडव
ही आग पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरच लागल्याने मुंबईवरुन पुण्य़ाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी पावणे सात वाजता सूरतकडे जाणाऱ्या कापसाच्या ट्रकने पेट घेतला. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरच हा अग्नितांडव झाल्याने लागलेल्या आगीनंतर महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली.
पुण्याकडील वाहतूक सुरू करण्यात आली असून मुंबईकडे जाणारी वाहतूकही हळू-हळू पूर्वपदावर येते आहे. पण सध्या तरी एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.