दोन रुपयांनी महागला बेस्टचा प्रवास

best
मुंबई : अखेर बेस्ट बस प्रवास दोन रुपयांनी महागणार असून प्रवाशांवर बेस्ट उपक्रमाचा आर्थिक तोटा भरून काढण्याच्या नावाखाली भार टाकण्यात आला आहे. बेस्ट सातत्याने दरवाढ करीत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बेस्टचा २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या बेस्टच्या अर्थसंकल्पाला दोन रुपये दरवाढीच्या प्रस्तावासह मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. आता हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभागृहात मांडण्यात येणार आहे.

बेस्टचा २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा ७१८५.५६ कोटीचा आणि ९४६.३२ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प बेस्टने जसा सादर केला तशाचा तसाच स्वीकारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारीमध्ये एक रुपया तर दुसर्‍या टप्प्यात एप्रिलमध्ये आणखी एक रुपया दरवाढ करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.

Leave a Comment