ट्विटरचे किंग बनले अमिताभ बच्चन

amitabh1
कोलकाता – बॉलीवूडचे बिग बी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या माध्यमातून सोशल मिडीयावर ट्विटरचे किंग बनले असून डिजीटल सर्व्हिस प्रोव्हायडर ‘टू द न्यू’ ने ही क्रमवारी जाहीर केली आहे. त्यांनी ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय आणि सक्रिय असलेल्या बॉलीवूड कलाकारांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

पहिल्या स्थानावर असलेल्या ७२ वर्षीय अमिताभ बच्चन यांचे एक कोटी २० लाख फॉलोअर्स आहेत. तर दुस-या स्थानावर असलेल्या किंग खान शाहरुखचे एक कोटी चार लाख फॉलोअर्स आहे तर या क्रमवारीत अभिषेक बच्चनतिस-या स्थानावर आहे. बॉलीवूड कलाकारांचे ट्विटरवरील फॉलोअर्स, फॉलोअर्समध्ये होत असलेली वाढ आणि दिवसातील ट्विट यावरुन ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे.

Leave a Comment