अमृता फडणवीस मुंबईत दाखल

amruta
मुंबई – मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना मुंबईत बदली मिळाली असून त्या लवकरच मुंबईतील बँक शाखेत रूजू होणार आहेत. अमृता अॅक्सिस बँकेच्या नागपूर शाखेत असोसिएटेड व्हाईस प्रेसिडेंट व नागपूर शाखा हेड म्हणून कार्यरत होत्या. त्यांना आता मुंबईला बदली मिळाली आहे.

नोकरी सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगून अमृता म्हणाल्या की प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर असले पाहिजे ही शिकवण मला लहानपणापासून मिळाली आहे. आर्थिक स्वातंत्र्य हे महिलांसाठी आवश्यक आहे त्यामुळे आपण नोकरी सोडण्याचा विचार करणार नाही. आता पूर्वीसारखे आयुष्य राहिलेले नाही कारण देवेंद्र मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे.

अमृता, देवेंद्र आणि त्यांची कन्या दिविजा यांना एकत्र राहण्यासाठी वेळ कमी मिळतो हे मान्य करून त्या म्हणाल्या की तरीही आम्ही थोडा वेळ काढतो. बहुदा रविवार त्यासाठी मिळतो. गाणी गुणगुणण्याची, लोकांत मिसळण्याची आणि संवाद साधण्याची आवड पहिल्यापासून आहे. त्यामुळे एकटेपणा कमी होते. बँकींग हेच माझे करियर आहे. देवेंद्र आणि अमृता यांचा २००६ साली विवाह झाला असून अमृता यांचे आईवडील डॉक्टर आहेत. आपल्याला कामाची प्रेरणा आईपासून मिळाल्याचे त्या सांगतात.

Leave a Comment