मायक्रोसॉफट विंडोज १० पुढच्या वर्षात

windows
मायक्रोसॉफ्टने त्यांची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज १० लवकरच सादर करण्याची तयारी सुरू केली असून येत्या २१ जानेवारीला होत असलेल्या एका कार्यक्रमात विंडोज १० संबंधीची घोषणा केली जाणार आहे असे समजते. या ऑपरेटिंग सिस्टीमचा कंझ्युमर प्रिव्हू १० सप्टेंबरला प्रथम लोकांसमोर सादर केला गेला होता. विंडोज १० रिलीज होण्यापूर्वी युजर ही सिस्टीम कशी असेल याचे अंदाज बांधू लागले आहेत.

विनबेटने लाँच केलेल्या व्हिडीओत या विंडोज १० चे प्रथम दर्शन घडविले आहे. त्यात दाखविलेल्या कांही फिचर्सप्रमाणे यात कोर्टना विंडोज, पर्सनल व्हॉईस असिस्टंट, कॉन्टॅक्ट सपोर्ट, सेटिंग्ज फिचर्स दिसत आहेत त्याचबरोबर यांची खासियत म्हणजे स्टार्ट मेन्यू फिचर यात परत अॅड केले गेले आहे. विंडोज ८ मध्ये हे फिचर काढून टाकले गेले होते मात्र त्यामुळे युजरना विशेषतः डेस्कटॉप युजरला अनेक अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर कंपनीने ८.१ विंडोजमध्ये स्टार्ट फिचर परत दिले होते.

जाणकारांच्या आणि तज्ञांच्या मते विंडोज १० युजरसाठी अधिक सुलभ वापरता येईल. पुढच्या वर्षाच्या मध्यात ही सिस्टीम बाजारात उपलब्ध होईल असा अंदाज आहे. २१ जानेवारीच्या कार्यक्रमात यातील गेमिंग विषयी चर्चा होणार असल्याचेही सांगितले जात आहे. या विंडोजला विंडोज ८ प्रमाणे टाईल्स इंटरफेस नाही. स्टार्ट मेन्यूनंतर टाईल्स फिचर दिसणार आहे. कीबोर्ड आणि माऊसचा वापर करणार्‍या युजरना त्यामुळे अधिक सुलभतेने त्याचा वापर करता येणार आहे. अन्य फिचर्समध्ये टाकस व्हू पाहता येणे, सर्च रिझल्ट मध्ये संगणकाशिवाय इंटरनेट लिस्टींग पाहण्याची सुविधा, डेक्सटॉपवर वेगवेगळ्या साईजच्या विंडोज सेट करणे शक्य होणार आहे.त्याचबरोबर एका विंडोजमधील अॅप दुसर्याा व्हर्च्युअल डेस्कटॉपवर नेता येणार आहे.

Leave a Comment