पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना होणार फाशी!

nawaj-sharif
पेशावर – पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी दहशतवादी हल्लाप्रकरणातील दहशतवाद्यांच्या फाशीच्या शिक्षेवर असलेली बंदी आर्मी पब्लिक स्कूलमधील १३२ विद्यार्थ्यांची क्रूर कत्तल झाल्यानंतर अखेर उठवल्यामुळे दहशवादी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळू शकेल.

मंगळवारी पेशावर शहरात झालेला हल्ला हा दुःखदायक होता. या हल्ल्यात ज्यांचे प्राण गेले त्याचे बलीदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. पाकिस्तान दहशतवादाविरुद्धची लढाई सुरुच ठेवेल असे शरीफ यांनी सर्व पक्षीय बैठकीत सांगितले.

२००८पासून फाशीच्या शिक्षेवर पाकिस्तानमध्ये बंदी असून गेल्या वर्षी जूनमध्ये सत्तेत आलेल्या शरीफ यांनी ही बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र देशांतर्गत दबावामुळे त्यांना हा निर्णय घेता आला नव्हता. अर्थात हा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा युरोपीय महांसघातील देशांसोबत असलेला बंद होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment