दहशतवाद्यांनी केला काबूल बॅंकेवर हल्ला, १० ठार

terrorist
काबूल : अफगाणिस्तानामधील हेलमंड भागातील न्यू काबूल बँकेवर फिदायीन दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

अनेक जणांना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवल्याले असून गेल्या तीन दिवसांतील हा लागोपाठ तिसरा दहशतवादी हल्ला असून सर्व प्रथम ऑस्ट्रेलिया, नंतर पाकिस्तान आणि आता अफगाणिस्तानातले हेलमंड शहर दहशतवाद्यांनी लक्ष केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पेशावरच्या हल्ल्यानंतर तालिबानला संपवण्याचा विडा उचलला असून अफगाणिस्तानसोबत संयुक्त मोहीम उघडून तालिबानचा खातमा करू, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर अतिरेक्यांसोबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असेही ते म्हणालेत.

पाकिस्तानमधील शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर भारताताही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व राज्यांना सतर्क राहण्याची सूचना गृहमंत्रालयाने केली आहे. सर्व शाळा, कॉलेजेस तसंच महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली आहे.

Leave a Comment