बुलढाणा : मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरुन सरकारला धारेवर धरले असून स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारने पॅकेजच्या नावाखाली तुटपुंजी मदत करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका केली.
मित्रपक्षाचा सरकारला घरचा आहेर
विदर्भ आणि मराठवाड्यात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने दुष्काळ दिलासा यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा बुलडाण्यात येऊन पोहोचली त्यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते. याशिवाय त्रस्त द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देण्याची गरज यावेळी खोत यांनी बोलून दाखवली.
निर्य़ात होणाऱ्या द्राक्षांचा खर्च एकरी अडीच ते तीन लाख इतका झालेल्यामुळे सरकारने दिलेले पॅकेज हे तुटपुंजे आहे. एक एकर द्राक्षावर फवारणी करायचे झाल्यास एकरी वीस हजार रूपये खर्च होत असल्यामुळे सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. सरकारने द्राक्ष बागायतदारांचे पीक कर्ज माफ करण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.