ब्रिस्बेन : अॅडलेडमधल्या हुकलेल्या शतकाची सलामीवीर मुरली विजयने ब्रिस्बेन कसोटीत शतक झळकावून भरपाई केली. मुरलीचे शतक आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ८३ षटकात ४ बाद ३११ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळ संपला तेव्हा, रहाणे ७५ तर रोहित शर्मा २६ धावांवर खेळत आहेत.
पहिल्या दिवसअखेर भारताची ३११ धावांवर मजल; मुरलीचे शतक
टीम इंडियाच्या फलंदाजांनी आज ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवरच्या खेळपट्टीचा पूरेपूर लाभ उठवल्यामुळेच ब्रिस्बेनच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताला ४ बाद ३११ अशी भक्कम स्थितीत मजल मारता आली. अजिंक्य रहाणेनही नाबाद ७५ धावांची दमदार खेळी केली. विजय आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची मजबूत भागीदारी रचली आणि त्यानंतर आलेल्या रोहित शर्माच्या साथीने रहाणेने पाचव्या विकेटसाठी ५० धावांची अभेद्य भागीदारी केली.