इराक युद्धात १९८ एडी मध्ये म्हणजे हजारो वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या विचवांच्या बॉम्बचा उपयोग इस्लामिक स्टेटचे दहशतवादी नव्याने करू लागले असल्याचे वृत्त आहे. हजारो वर्षांपूवी रोमनांची आक्रमणे रोखण्यसाठी आणि त्यांना प्रतिकार करण्यासाठी या युक्तीचा वापर इराकमध्ये केला जात असे. त्यावेळी मातीच्या भांड्यात विषारी विंचू भरून ती रोमन आक्रमकांच्या कँपवर फेकली जात असत. तीच कल्पना आता इसिसचे दहशतवादी वापरत आहेत. या भागात नागरिकांत दहशत पसरविण्यासाठी इसिस अतिविषारी विचवांनी भरलेले बॉम्ब इराकी गांवा शहरात टाकत आहेत. हे बॉम्ब फुटले की हजारो विषारी विंचू गावाशहरात चोहीकडे पसरत आहेत.
इसिसकडून विचवांच्या बॉम्बचा होतोय वापर
विंचू हा प्राणी अतिशय चिवट म्हणून ओळखला जातो. त्याला मानवी वस्तीपासून कितीही दूर नेऊन सोडले तरी तो पुन्हा परत येऊ शकतो. कांही विंचू इतके विषारी असतात की त्यांच्या चावण्यामुळे माणूस मरू शकतो. अशा विंचवांनी दहशत माणसांना मोठीच वाटते. भीती पसरविण्याची मोठी कामगिरी हे विंचू पार पाडतात असे सांगितले जाते. इराकी वरीष्ठ अधिकारी या संदर्भात म्हणाले की या विचूंमुळे मालमत्तेचे नुकसान होत नाही मात्र माणसांवर मोठे मानसिक दडपण येते. इसिसचा हाच उद्देश आहे आणि त्यांनी आता आमच्या निरपराध नागरिकांना टार्गेट करण्यासाठी हा मार्ग चोखाळला आहे.