आयफेल टॉवर आईस स्केटिंग रिंग सुरू

effel
पॅरिस – फ्रान्सची राजधानी पॅरिस मधील टोलेजंग आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावरील स्केटिंग आईस रिंग महोत्सवाची सुरवात ८ डिसेंबरपासून झाली असून हा आनंद पर्यटकांना १५ फेब्रुवारीपर्यंत लुटता येणार आहे. दर वर्षी हा उत्सव साजरा केला जातो मात्र गेली दोन वर्षे टॉवरच्या पहिल्या मजल्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने पर्यटकांना आणि पॅरिसवासियांनाही या आनंदाला आणि मनोरंजनाला मुकावे लागले होते.

आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावर या मौजेसाठी १९० मीटरचे बर्फाची रिंग तयार करण्यात आली आहे. ही स्केटिग रिंग जमिनीपासून २०० फूट उंचीवर आहे. यंदाची थीम चमकता लाल रंग असल्याने या जागेत स्वागतासाठी १८ फुटांहून उंच असा लाल झगमगता आयफेल टॉवर उभारला गेला आहे.

येथे लहान मुलांसाठी लहान स्केट उपलब्ध करून दिले गेले आहेतच पण ज्यांना चालणे शक्य नाही किवा स्केटिंग करता येणार नाही त्यांच्यासाठी पेंग्विन स्लेज चेअर्सही सज्ज आहेत. या आनंदाचा अनुभव लुटण्यासाठी हजारो पर्यटक तसेच देशवासी येथे येत आहेत.विशेष म्हणजे ही आईस स्केटिंग रिंग मोफत वापरता येणार आहे. मात्र त्यासाठी टॉवरवर प्रवेश तिकीट म्हणून ९ पौंड खर्चून तिकीट घ्यावे लागणार आहे.

Leave a Comment