संमेलनात राजकारण्यांचा योग्य सन्मान राखला जाईल : डॉ. सदानंद मोरे

sadanand-more
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्याची गरज असल्याची अपेक्षा पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केली.

या वेळी संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस सुनीत भावे उपस्थित होते. सीमाप्रश्नी ठराव मांडले जातात. परंतू, नुसते ठराव न मांडता न्यायालयातही महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्याची गरज असून त्याचवेळी साहित्य संमेलनात असे ठराव मांडल्यास या प्रश्नाची तीव्रता सरकारला कळेल, असेही ते म्हणाले.

संमेलन म्हणजे पवित्र गायींचा गोठा नव्हे, असे सांगतानाच साहित्य संमेलनात राजकारण्यांविषयी अस्पृष्यता बाळगू नये. संमेलनात राजकारण्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असेही मोरे या वेळी म्हणाले.

Leave a Comment