लिंट चॉकलेट कॅफे – १०० देशांत अब्जावधींची उलाढाल

lindt
सिडनी- ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या मध्यभागात असलेल्या लिंट चॉकलेट कॅफेमधील थरार नाट्य संपुष्टात आले असतानाच ही कॅफे चेन जगभरात व्यवसाय करत असल्याचे समजते. या लिंट कॅफेच्या जगातील १०० हून अधिक देशांत शाखा असून त्यांची वार्षिक उलाढाल ६५० अब्ज रूपयांची असल्याचे सांगितले जात आहे. भारतातही या चेनची शाखा मुंबईत वरळीमध्ये असून ऑस्ट्रेलियात त्यांच्या ८ शाखा आहेत.

या कॅफे चेनमध्ये नऊ हजार कर्मचारी नोकरी करतात आणि या कॅफेचा ब्रँड अँबेसिडर आहे प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर. ही स्विस कंपनी आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनी कॅफे शाखेत दहशतवाद्यांनी बंधक बनविलेल्या नागरिकात दोन भारतीयांचा समावेश होता आणि त्यांची नांवे आहेत अंकित रेड्डी आणि पुप्षेंद्रू घोष. दोघेही सुखरूप असल्याचे समजते. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून मुख्य हल्लेखोर इराणी शरणार्थी शेख हासन हारून पोलिसांकडून मारला गेला तर हसनने एका बंधकाला ठार केल्याचेही समजते.

Leave a Comment