पुन्हा एकदा स्वस्त झाले पेट्रोल, डिझेल

petrol
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील तेल पुरवठा करणा-या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमतीमध्ये घट झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी दोन रुपयांनी कपात केली असून ही कपात काल मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.

या दर कपातीमुळे मुंबईतील पेट्रोलचे दर ७०.७३ रुपयावरून ६८.६५ इतके होणार असल्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात पेट्रोल २ रुपये आठ पैशांनी कमी होणार आहे. तर डिझेलचे दर ६०.११ रुपयांवरून ५७.९१ रुपये होणार आहेत. डिझेलमधील कपात ही २ रुपये २० पैशांनी असेल.

ऑगस्टपासूनची पेट्रोलच्या दरातील ही आठवी कपात असून तर ऑक्टोबरपासूनची डिझेलच्या दरातील चौथी कपात आहे. ऑगस्टपासून आतापर्यंत झालेल्या कपातीमुळे पेट्रोलचे दर १२.२७ रुपयांनी कमी झाले आहेत.

Leave a Comment