दोन लाखाहून अधिक तक्रारी लोकायुक्तांकडे प्रलंबित

rti
मुंबई – दोन लाखाहून अधिक तक्रारी गेल्या १५ वर्षात राज्यातील लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त यांच्याकडे दाखल झाल्या असून त्यापैकी ६५.३२ टक्के तक्रारी निकालात काढण्यात आल्या तर केवळ एक टक्के तक्रारीवर कारवाई करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.

तसेच १२७ मंत्र्यांविरुद्ध गेल्या १५ वर्षात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी केवळ चार तक्रारीमध्ये लोकायुक्तांना तथ्य आढळल्याचे माहितीच्या अधिकारात सांगण्यात आले आहे.

माहितीच्या अधिकारात गेल्या १५ वर्षातील माहिती माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली होती. राज्यात २००० ते २०१४ या काळात दोन लाख सहा हजार २६९ तक्रारी दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यात लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त ही पदे १९७१पासून आहेत. मात्र प्रथमच ही पदे रिक्त आहेत असे गलगली यांनी सांगितले.

Leave a Comment