एका बटाट्यावर ४० दिवस चालेल विजेचा बल्ब

batata
राबिनोविच आणि त्यांचे सहकारी अॅलेक्स गोल्डबर्ग व बोरिस रूबिन्स्की यांनी गेली अनेक वर्षे सुरू ठेवलेल्या प्रयोगातून बटाट्याच्या मदतीने घरच्या घरी चाळीस दिवस एक एलइडी बल्ब चालविता येईल हे सिद्ध करून दाखविले आहे. यामुळे जगात विजेपासून वंचित असलेल्या १२० कोटी नागरिकांना कमी खर्चात वीज मिळू शकेल असा त्यांचा दावा आहे. हे संशोधक कॅलिफोर्निया विद्यापीठात २०१० सालापासून हे प्रयोग करत आहेत.

यात बटाट्यातील अॅसिडचा वापर केला गेला आहे. जस्त आणि तांबे यांच्यापासून बनविलेल्या संयंत्रावर बटाट्यातील अॅसिडची प्रक्रिया होऊन त्यातून ऊर्जा निर्माण होते व त्यावर हे बल्ब पेटतात असे त्यांचे म्हणणे आहे. यातून निर्माण होणारे व्होल्टेज कमी आहे मात्र त्यापासून अशी बॅटरी बनविणेही शक्य आहे की ज्यावर मोबाईल, लॅपटॉपही चार्ज होऊ शकतील असाही त्यांचा दावा आहे. विकसनशील देशांत जेथे रॉकेलचा वापर करावा लागतो त्या खर्चाच्या सहापट कमी खर्चात ही वीज मिळू शकेल असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment