जगातला स्लिमेस्ट विवो एक्स ५ मॅक्स भारतात दाखल

vivi-x5
जगातील सर्वात स्लीमेस्ट स्मार्टफोन विवो एक्स फाइव्ह मॅक्स भारतात लाँच करण्यात आला असून त्याची किंमत आहे ३२९८० रूयपे. या फोनसाठी फोर जी कनेक्टीव्हीटी दिली गेली आहे. चीनी स्मार्टफोन मेकर विवो ने यासोबत आणखी चार स्मार्टफोनही भारतात सादर केले असून त्यांची नावे आहेत विवो एक्स शॉट, विवो वाय २२, विवो वाय १५ आणि विवो एक्सथ्री एस.

यापूर्वी आप्पो कंपनीने जगातील सर्वात स्लीम स्मार्टफोन बनविला होता. मात्र विवोचा स्मार्टफोन त्यापेक्षाही स्लीम असून त्याची जाडी आहे ४.७५ मिमि. हे सर्व स्मार्टफोन रिटेल स्टोअर्समध्येही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत मात्र सध्या ते फक्त ऑनलाईन विक्रीसाठीच उपलब्ध आहेत.

विवो एक्स फाईव्ह मॅक्ससाठी ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन देण्यात आला आहे. १६ जीबी इंटरनल मेमरी, १३ एमपीचा रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह, सोनीचा आयएमएक्स २१४ कॅमेरा सेन्सर, व्हीडीओ कॉलींग, सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ब्ल्यू टूथ, फोर जी, वायफाय, मायक्रो यूएसबी, जीपीआरएस, थ्रीजी कनेक्टीव्हीटी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment