सिडनेत कॅफेवर दहशतवादी हल्ला- ५० हून अधिक बंधक

sydney
सिडनी – सिडनीच्या मध्यवस्तीत मार्टिन प्लेस येथे असलेल्या चॉकलेट कॅफे मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला चढवून तेथील ५० हून अधिक जणांना बंधक बनविले असल्याचे वृत्त आहे. या बंधकांत कांही भारतीय असल्याची भीतीही व्यक्त केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याच्या निषेध केला आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ प्रमाणेच हा हल्ला असून हल्लेखोरांच्या हातात काळे झेंडे आहेत आणि त्यावर अरबी भाषेतील मजकूर आहे असेही समजते.

दहशतवादी हल्लेखोर बंदुकधारी आहेत. कॅफेच्या खिडक्यांमधून ते काळे झेंडे फडकावित आहेत. त्यांना पंतप्रधान टोनी अॅबोट यांच्याशी चर्चा करायची असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तातडीने या कॅफेच्या आसपासचा परिसर ताब्यात घेतला असून येथील कार्यालये रिकामी केली आहेत. या भागात रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रलियासह देशातील अन्य दोन मोठ्या बँकांची मुख्यालये आहेत. या परिसराकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत व येथील नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगितले गेले आहे.

पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे पत्रकरांशी बोलताना सांगितले आहे. हे दहशतवादी सिरीयातील अल सबा दहशतवादी संघटनेशी संबंधित असावेत असाही अंदाज केला जात आहे.

Leave a Comment