रायगडावरील शासकीय मानवंदनेची प्रथा खंडीत

shivaji-maharaj
रायगड : रायगडावर शिवाजी महाराजांना दिली जाणारी शासकीय मानवंदना बंद झाल्याची माहिती समोर आल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. शासकीय दरबारी ही मानवंदना पुन्हा सुरु करण्यासाठी शिवप्रेमींचे प्रयत्न सुरु असून त्याला सरकार दाद नसल्याचा आरोप केला जात आहे.

पोलीस दलातर्फे चार कर्मचारी यापूर्वी रोज पहाटे गडावर जाऊन महाराजांना मानवंदना देत होते पण मागील पाच वर्षांपासून आर्थिक तरतुदी अभावी ही प्रथा बंद पडली असून ना पोलिसांचे ना प्रशासनाचे लक्ष या प्रथेकडे आहे .

ही प्रथा बंद पडल्याची माहितीही सुरुवातीचे काही दिवस नव्हती. पण हा प्रकार काही शिवप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली कैफियत सरकार दरबारी मांडली. पण अजूनपर्यंत त्याला यश न आल्यामुळे महाराष्ट्राचा पाया रचणाऱ्या महाराजांना वंदन करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडे वेळ आणि पैसा नाही का असा प्रश्न निर्माण होतो?.

Leave a Comment